Breaking News
Home / Featured / पश्चिम नागपुरातील काही भागात सोमवारी सकाळी वीज नाही

पश्चिम नागपुरातील काही भागात सोमवारी सकाळी वीज नाही

वीजवितरण यंत्रणेच्या सक्षमीकरणाचे सुरु करणार काम 

 

नागपूर, दि. 17 :

दक्षिण-पश्चिम नागपुरातील वीजवितरण यंत्रणेच्या सशक्तीकरणासाठी महावितरणच्या 33 केव्ही त्रिमुर्ती उपकेंद्राला वीजपुरवठ्याचा अतिरीक्त स्त्रोत उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. यामुळे त्रिमुर्तीनगर उपकेंद्रातून निघणा-या जयताळा, त्रिमुर्तीनगर, खामला, अमेय, शास्त्री लेआऊत, प्रसाद नगर, दिनदयालनगर, जयप्रकाशनगर, टेलीकॉमनगर, भेंडे लेआऊट या वाहिन्यांवरील वीजपुरवठा सोमवार दि. 19 मार्च रोजी सकाळी 7 ते 10 या वेळेत स्थगित केला जाणार आहे.

केंद्र शासन पुरस्कृत एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत महावितरणच्या कॉग्रेसनगर विभागात सुमारे 86 कोटींची वीज वितरण यंत्रणा सक्षमीकरणाची कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत, या कामा अंतर्गर त्रिमुर्तीनगर उपकेंद्राला वीजपुरवठ्याचा पर्यायी स्त्रोत उपलब्ध करून दिल्या जात असून यासाठी क्त्रिमुर्तीनगर उपकेंद्रातून ग्राहकांना वीजपुरवठा करणा-या दहाही वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा स्थगित केला जाणार आहे. यामुळे तलमले लेआऊट, भांगे विहार, शहाणे लेआऊट, सुर्वेनगर, एलआयजी, एमआयजी, त्रिमूर्तिनगर, गोरले लेआऊट, नेलको सोसायटी, सुमितनगर, रिंग रोड, शास्त्री लेआऊट, अग्णे लेआऊट, खामला, सिंधी कॉलनी, टेलिकॉमनगर, प्रतापनगर, रिंग रोडचा भाग, सावरकर चौक, सेंट्रल एक्साईज कॉलोनी, वेंकटेशनगर, लोखंडेनगर, पठाण लेआऊट, सरस्वती विहार, कामगार कॉलनी, बंडू सोनी लेआऊट, कॉसमॉस टाऊन. पायोनियर सोसायटी, आदिवासी सोसायटी, त्रिशरणनगर, अशोक कॉलनी, जयताळा, प्रसादनगर, दुबे लेआउट, अमरआशा, दाते लेआउट, शारदानगर, घरकुल सोसायटी, प्रगतीगर, अष्टविनायकनगर, संघर्षनगर, जीवनछाया, दीनदयालनगर, स्वावलंबीनगर, पोडोळे चौक, एनआयटी गार्डन, भेंडे लेआऊट, लोकसेवानगर, प्रियदर्शनीनगर, ब्लॅक डायमंड, पागे लेआऊट, इंद्रप्रस्थनगर, पाटील लेआऊट, पन्नासे लेआऊट, एचबी इस्टेट, सोनेगाव बस्ती, सहकारनगर, गजाननधाम, जयप्रकाशनगर, चिंतामणीनगर, राजीवनगर, तपोवन कॉम्प्लेक्स, राहुलनगर, नरकेसरी लेआऊट, श्यामनगर, पॅराडाइज सोसायटी, सुजाता लेआऊट, आझादहिंदनगर, संचयनी कॉम्पलेक्स, रवींद्रनगर, मनीष ले\आऊट, पाटील लेआऊट, स्वागत सोसायटी, सीजीएच सोसायटी, जयबद्रीनाथ आदी भागातील वीजपुरवठा सोमवारी सकाली 7 ते 10 या वेळेत स्थगित ठेवला जाणार आहे.

महावितरणतर्फ़े दर बुधवारी देखभाल व दुरुस्तीमुळे काही भागांचा वीज पुरवठा ग्राहकांना पुर्वसुचना दिल्यानंतर बंद ठेवण्यात येतो, मात्र दहावी आणि बारावीची परिक्षा सुरु असल्याने परिक्षार्थ्यांना याचा त्रास होऊ नये म्हणून महावितरणने नियोजीत देखभाल व दुरुस्तीचे काम अनेकदा पुढे ढकलले आहे. मात्र एकात्मिक ऊर्जा विकास योजने अंतर्गत त्रिमुर्तीनगर उपकेंद्राचा वीजपुरवठा स्थगित करावा लागत असल्याने या उपकेंद्रातून पुरवठा होणा-या ग्राहकांचा वीजपुरवठा सोमवार दि. 19 मार्च रोजी सकाळी 7 ते 10 यावेळेत स्थगित केला जाणार आहे. महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या या भागातील वीज ग्राहकांना एसएमएसच्या माध्यमातून पुर्वसुचनाही देण्यात येईल, ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

About admin

Check Also

जगुआर एफ-टाइप को फोर-सिलेंडर पावरट्रेन से मिली शानदार चपलता और कार्यकुशलता

  जगुआर एफ-टाइप में टर्बोचार्ज्ड फोर-सिलेंडर इनजीनियम पेट्रोल इंजन लगाया गया एक असली जगुआर स्पोर्ट्स …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!