Breaking News
Home / Featured / पालक व विद्यार्थ्यांचा भव्य शांती मार्च

पालक व विद्यार्थ्यांचा भव्य शांती मार्च

नागपूर, दि. 17 ( दिनेश घरडे ) :
 
बेझनबाग येथील दी शिख एज्युकेशन सोसायटी  द्वारा संचालित गुरूनानक प्राथमिक व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय शासनाने आपल्या हाती घेवून स्वत: चालवावे, या मांगणीसाठी पालक संघर्ष समिती तर्फ शनिवारी दुपारी यशवंत स्टेडियम येथून पालक व विद्यार्थ्यांचा भव्य शांती मार्च काढण्यात आला. हा शांती मार्च संविधान चौकात पोहचल्यावर तेथील डॉं. बाबा साहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून एक शिष्ठमंडळ जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांची भेट घेऊन त्यांच्या मार्फत मुख्यंमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.
          बेझनबाग येथील दी शिख एज्युकेशन सोसायटी  द्वारा संचालित गुरूनानक प्राथमिक व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा बंद करण्याची परवानगी नागपूर खंड पीठाने दिली आहे. याचप्रमाणे उच्च न्यायालयाने शिक्षण विभागाला शाळेच्या शिक्षकांची व विद्यार्थ्याची पर्याय व्यवस्था करण्याचे आदेश दिले. शिक्षण संस्थेने उच्च न्यायालयात याचिका  दाखल करून शाळा बंद करण्याची परवानगी मांगितली होती. शाळा बंद करण्याचे प्रकरण २०१६ पासून सुरु आहे. आर्थिक संकटाचे कारण देत शाळेने शिक्षण विभागाला शाळा बंद करण्याची परवानगी मांगितली होती. परंतु त्यांना शिक्षण विभागाने संस्थेला शाळा बंद करण्याची परवानगी दिली नव्हती. यामुळे  शिक्षक व पालकांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना शाळा बंद करू नये अशी मांगणी केली होती. यानंतर त्यांनी शाळा बंद करण्यास नकार दिला होता. त्यामुळे शाळेच्या व्यवस्थापनाने शिक्षण विभागाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हाण दिले. उच्च न्यायालयाने व्यवस्थापनाला शाळा बंद करण्याची परवानगी असल्याचे स्पष्ट केले. दीपक काळे यांच्यासह इतरही शिक्षकांनी मध्यस्थी अर्जाद्वारे शाळा बंद करू नये, अशी विनंती केली होती. परंतु दोन्ही बाजू ऐकून उच्च न्यायालयाने व्यवस्थापनाला शाळा बंद करण्याची परवानगी दिली. ही परवानगी मिळाल्याने संस्थेने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ३५०० विद्यार्थ्यांसह शिक्षक व अन्य कर्मचाऱ्याचे भविष्य अंधारात येणार आहे. शासनाने यांचे गांभिर्य लक्षात घेवून ही शाळा स्वत: चालवावी. या मांगणी करीता विद्याथी, पालक, व शिक्षकांनी भव्य  शांती मार्च काढून एक शिष्ठमंडळ जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांची भेट घेऊन त्यांच्या मार्फत मुख्यंमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.

About admin

Check Also

जगुआर एफ-टाइप को फोर-सिलेंडर पावरट्रेन से मिली शानदार चपलता और कार्यकुशलता

  जगुआर एफ-टाइप में टर्बोचार्ज्ड फोर-सिलेंडर इनजीनियम पेट्रोल इंजन लगाया गया एक असली जगुआर स्पोर्ट्स …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!