Breaking News
Home / Featured / पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण सन्मान प्रदान

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण सन्मान प्रदान

मुंबई, दि. १६ :

महाराष्ट्र टाईम्सच्यावतीने देण्यात येणारा म.टा.सन्मान २०१८ मधील सर्वोच्च असा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ज्येष्ठ संगीतकार, गीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना प्रदान करण्यात आला. रविंद्र नाट्य मंदिर येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी टाईम्स वृत्त समुहाचे सीओओ श्रीजित मिश्रा, महाराष्ट्र टाईम्सचे कार्यकारी संपादक अशोक पानवलकर आदींची उपस्थिती होती. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते पंडित हृदनाथ मंगेशकर यांना सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ प्रदान करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र टाईम्सने गेली अनेक दशके वाचकांच्या मनावर पकड घेतली आहे. म.टा. सन्मानाने समाजातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्याची परंपरा सुरू झाली आहे. विशेषतः कला क्षेत्रात म.टा. सन्मानाचे आगळे स्थान निर्माण झाले आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना म.टा.चा हा सर्वोच्च सन्मान देताना विशेष आनंद होतो आहे. या सन्मानासाठी मी त्यांचे अभिनंदन करतोच. पण त्यांना दीर्घायू आणि उत्कृष्ट आरोग्य लाभो. त्यांच्या हातून संगीत क्षेत्राची आणि रसिकांची अशीच सेवा घडत राहो, असे अभिष्टचिंतनही करतो. आज भारतामध्ये संगीत, गीत या क्षेत्रात हृदयाला स्पर्श करून जाणारी भावना ही मंगेशकर कुटुंबियांच्या उल्लेखाशिवाय पुर्ण होऊच शकत नाही. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या व्यक्तिमत्त्वातही असेच पैलू आहेत. ज्यामुळे हा सर्वोच्च सन्मानही यथोचित ठरल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सन्मानप्राप्त पंडित हृदनाथ मंगेशकर यावेळी बोलताना म्हणाले, मी १९५५ पासून गाणी करतोय. त्यातील अनेक गाणी आजही रसिक ऐकताहेत. हा पुरस्कार म्हणजे त्या काळाचा, त्या सुरांचा आणि कविंच्या शब्दांचा विजय आहे. संगीतकार, गायक आणि कवी किती एकरूप व्हायचे, त्या एकरुप होण्याच्या काळासाठीचा हा पुरस्कार आहे, असे मी मानतो.

म.टा. सन्मान २०१८ या सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About admin

Check Also

New Team of Office Bearers of OSN installed on Sunday

Nagpur, (AVT News Bureau) : The Installation Ceremony of the newly elected body of office …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!