Home / Featured / पीएच.डी पदवीधारकांमध्ये भारत जगात चौथ्या क्रमांकावर

पीएच.डी पदवीधारकांमध्ये भारत जगात चौथ्या क्रमांकावर

नवी दिल्ली, दि. १२ :
विविध विषयात संशोधन करून पीएच.डी पदवी मिळविणाऱ्या देशांमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर आहे. आर्थिक सहयोग व विकास संस्था (ओईसीडी) या संस्थेने ही क्रमवारी जाहीर केली आहे. पीएच.डी पदवी मिळविणाऱ्या देशात अमेरिका पहिल्या स्थानावर आहे.

आर्थिक सहयोग व विकास संस्थेने (OECD) २०१४ साली पीएच.डी पदवी प्राप्त केलेल्या एकूण संशोधकांच्या संख्येनुसार रँकिंग जाहीर केली आहे. `ओईसीडी` च्या अहवालानुसार जगातील १५ देश हे पीएच.डी पदवीधारकांच्या संख्येत आघाडीवर आहेत. हे देश उच्च शिक्षणात गुंतवणूक करीत आहेत. त्यामुळेच पीएच.डी धारकांच्या संख्येत वाढ होत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

भारतात २०१४ साली २४ हजार ३०० पीएचडी पदवीधारक :
सन २०१४ या वर्षात भारतात सर्व विषयातील मिळून पीएचडी पदवी प्राप्त करणाऱ्यांची संख्या ही २४ हजार ३०० इतकी असून जागतिक क्रमवारीत भारत चौथ्या स्थानावर आहे. याच काळात अमेरिकेत ६७ हजार ४४९ जणांनी पीएचडी मिळविली असून अमेरिका पहिल्या स्थानावर आहे तर जर्मनीने २८,१४७ पीएचडी पदवी प्राप्त करून जागतिक क्रमवारीत दुसरे स्थान पटकाविले आहे, तर इंग्लंडने २५ हजार २० पीएचडी पदवीधारकांसह जागतिक क्रमवारीत तिसरे स्थान मिळविले आहे. इंग्लंड आणि भारत या देशात पीएचडी धारकांच्या संख्येत फार मोठा फरक नाही हे लक्षात घेतले पाहिजे.


दक्षिण आफ्रिका १५ व्या स्थानावर :
पीएचडी पदवी प्राप्त करणाऱ्या देशात दक्षिण आफ्रिका १५ व्या स्थानावर आहे, २०१४ साली या देशात केवळ २०६० संशोधकांनी पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. रशिया हा देश ही २२२३ पीएचडी पदवी धारकांच्या संख्येसह १४ व्या स्थानावर आहे. पीएचडी पदवी मिळविणाऱ्या देशांमध्ये जपान (१६०३९) पीएचडी पदवीसह पाचव्या स्थानावर, फ्रान्स (१३७२९) सहाव्या, दक्षिण कोरिया (१२,९३१) सातव्या स्थानावर, स्पेन (१०,८८९) आठवे स्थान, इटली (१०,६७८) ९ व्या स्थानावर, ऑस्ट्रेलिया (८४००) दहाव्या स्थानी, कॅनडा (७०५९) अकरावे स्थान, तुर्की (४५१६) बारावे स्थान तर इंडोनेशिया हा देश ३५९१ पीएचडी धारकासह तेराव्या स्थानावर आहे.

उभरत्या अर्थव्यवस्थेत भारत आघाडीवर :
पीएचडी पदवी प्राप्त करणाऱ्या देशात भारत जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असला तरी, उभरत्या आर्थिक देशात भारताचा क्रमांक अव्वल ठरला आहे. जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स यासारख्या देशांना पीएचडी पदवीधर संख्येत मागे टाकले आहे.

(महान्यूज )

About admin

Check Also

सक्षम दशकपूर्ती समारोह कार्यक्रम आज

नागपूर : समदृष्टी क्षमता विकास एवम अनुसंधान मंडळ ( सक्षम ) या संस्थेला दहा वर्ष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!