Breaking News
Home / Featured / राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून बनावट मद्य जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून बनावट मद्य जप्त

6.55 लाख रुपयाच्या मालासह दोन इसमांना अटक

       

नागपूर, दि. 12 : 

राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या निरीक्षक ‘ब’ विभागाच्या वतीने मानेवाडा परिसरात   ढाब्यावर धाड टाकण्यात आली. या कारवाईत 6.55 लाख रुपयाच्या विदेशी मद्यासह  दोन इसमांना अटक करण्यात आली. 

राज्य उत्पादन शुल्क ‘ब’ विभागाचे निरीक्षक प्रशांत गोतमारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन हुडकेश्वर अंतर्गत मानेवाडा रिंग रोड परिसरात पाळत ठेवून अजय अशोकराव शेंडे यास हिरो ॲक्टीव्हा क्र. एमएच. 49 एएम 3990 व बनावट मद्यासह ताब्यात घेण्यात आले. तसेच त्याच्या आकाश नगर येथील घरातून  विविधप्रकारच्या मद्याच्या बाटल्यांची  झाकणे व लेबल जप्त करण्यात आले तसेच अजय शेंडे चा मेहूणा आशिष माणिकराव दरोटे याच्या अजनी परिसरातील घरातून बनावट विदेशी मद्य साठ्यासह वाहतुकीकरिता वापरण्यात येणारे चारचाकी वाहन जप्त करण्यात आले.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत 180 मिलीच्या 1434 बनावट मद्याच्या बाटल्या (30 पेटी) , 1500 बनावट झाकणे व लेबल, बनावट विदेशी दारु बॉटलींगचे साहित्य असा एकूण 6 लाख 55 हजार 472 रुपयाच्या मुद्देमालासह वरील दोघांना अटक करण्यात आली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय उपायुक्त उषा वर्मा, अधीक्षक स्वाती काकडे व उपअधीक्षक मिलींद पटवर्धन यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक प्रशांत गोतमारे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक चंदु दरोडे, जवान धवल तिजारे, विनोद डुंबरे, सुधीर मानकर, रेश्मा मते, समीर सईद व शिरीष देशमुख यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला.

About admin

Check Also

बहुजन विचारवंत जैमिनी कडू यांचे अपघाती निधन

नागपूर,दि.१७ :  फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतील सुप्रसिद्ध विचारवंत प्रा. जैमिनी कडू याचे निधन झाले आहे. त्यांचा सोमवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!