Home / Featured / स्थायी समिती सभापती विक्की कुकरेजा यांनी स्वीकारला नासुप्र विश्वस्तपदाचा पदभार

स्थायी समिती सभापती विक्की कुकरेजा यांनी स्वीकारला नासुप्र विश्वस्तपदाचा पदभार

 

महापौर नंदा जिचकार यांनी केला सत्कार

नागपूर, ता.१२ : 

सर्वसमान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्याने सोडविणार व त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव कटीबद्ध असणार असल्याचे प्रतिपादन नागपूर महानगरपालिकेचे नवनियुक्त स्थायी समिती सभापती विक्की कुकरेजा यांनी केले. नागपूर सुधार प्रन्यासच्या विश्वस्त म्हणून विक्की कुकरेजा यांनी सोमवार (ता.१२) पदभार स्वीकारला. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महापौर नंदा जिचकार, दक्षिण नागपूरचे आमदार व नागपूर भाजपाचे अध्यक्ष सुधाकर कोहळे, उत्तर नागपूरचे आमदार मिलिंद माने, नागपूर पदवीधर मतदार संघाचे आमदार प्रा. अनिल सोले, नागपूर महानगरपालिकेचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी, नासुप्रचे विश्वस्त भूषण शिंगणे प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे बोलताना कुकरेजा म्हणाले, नागपूर महानरपालिकेने व नागपूर सुधार प्रन्सासच्या माध्यमातून नागपूर शहरात विविध प्रकल्प,विकासकामे सध्यस्थितीत सुरू आहे. उत्तर नागपुरात सध्यस्थितीत कामे झाली नाहीत. ती कामे पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असेल.झोपड्डीवासीयांना त्यांच्या हक्काचे पट्टे मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नरत असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, विक्की कुकरेजा यांचा अनुभव दांडगा आहे. राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातील बारकावे त्यांनी माहिती आहेत. त्यांच्या ज्ञानाचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. नासुप्रचे प्रश्न ते नक्कीच सोडवतील. सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देतील, असेही त्या म्हणाल्या.

आमदार सुधाकर कोहळे बोलताना म्हणाले, विक्की कुकरेजा हे सक्षम नेते असून त्यांना नासुप्र आणि मनपाच्या अडचणी जाणीव आहे.सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना ते नक्कीच न्याय देतील, असा त्यांनी विश्वास बोलताना व्यक्त केला. त्यांच्यावर सोपविलेली जबाबदारी ते व्यवस्थितरित्या पार पाडतील यात काही शंका नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

प्रा. अनिल सोले यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले शहरातील विकासकामांना न्याय देण्यासाठी व त्याला गती देण्यासाठी विक्की कुकरेजा सर्मथ आहे, अशा शब्दात सोले यांनी गौरव केला. प्रारंभी महापौरांच्या हस्ते विक्की कुकरेजा यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती संजय बंगाले, दुर्बल घटक समितीचे सभापती महेंद्र धनविजय महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील, अग्निशमन समिती उपसभापती वर्षा ठाकरे, प्रतोद दिव्या धुरडे, ज्येष्ठ नगरसेवक जगदीश ग्वालबंशी, सुनील हिरणवार, राजेंद्र सोनकुसरे, नगरसेविका मंगला खेकरे, अभिरूची राजगिरे, उज्ज्वला शर्मा, नगरसेवक विजय चुटेले, लखन येरावार, अमर बागडे, प्रमोद कौरती, भाजपाचे संघटनमंत्री भोजराज डुंबे, चंदन गोस्वामी, घनश्याम कुकरेजा, प्रभाकर येवले, प्रताप मोटवाणी, विजय केवलरामानी यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विश्वस्त भूषण शिंगणे यांनी केले. दिलीप गौर यांनी आभार मानले.   

 

About admin

Check Also

सक्षम दशकपूर्ती समारोह कार्यक्रम आज

नागपूर : समदृष्टी क्षमता विकास एवम अनुसंधान मंडळ ( सक्षम ) या संस्थेला दहा वर्ष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!