Home / Featured / राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक जाहीर

राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक जाहीर

 मुंबई, दि. 5 :

महाराष्ट्र विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांकडून निवडून देण्यासाठीच्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी या महिन्यात निवडणूक घेण्यात येणार आहे. या निवडणुकींतर्गत दिनांक 12 मार्च पर्यंत नामनिर्देशन पत्रे दाखल करता येतील; तर दि. 23 मार्च 2018 रोजी मतदान घेण्यात येणार असल्याबाबत निवडणुकीची सूचना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाने प्रसिद्धीस दिली आहे.

 उमेदवार किंवा त्याच्या सूचकाला उमेदवारासाठीची नामनिर्देशनपत्रे कक्ष क्र. 1, तळमजला, विधानभवन, मुंबई येथे 12 मार्च 2018 पर्यंत सार्वजनिक सुट्टीचा दिवस वगळून सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मिळू शकतील. याच ठिकाणी व याच कालावधीत महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे उपसचिव व निवडणूक निर्णय अधिकारी विलास गो. आठवले किंवा महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे अवर सचिव व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष नलावडे यांच्या समक्ष उमेदवाराची नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील.

 नामनिर्देशनपत्रांची छाननी दि. 13 मार्च 2018 रोजी दुपारी 12 वाजता कक्ष क्र. 712, सातवा मजला, विधानभवन येथे करण्यात येईल.

 उमेदवारी मागे घेण्याची सूचना उमेदवार किंवा त्याच्या कोणत्याही सूचकाकडून किंवा उमेदवाराकडून लेखी अधिकार दिलेल्या निवडणूक अभिकर्त्याला दि. 15 मार्च 2018 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत देता येईल. निवडणूक लढविली गेल्यास दि. 23 मार्च 2018 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल, असेही निवडणुकीच्या सूचनेनुसार स्पष्ट करण्यात आले आहे.

About admin

Check Also

सक्षम दशकपूर्ती समारोह कार्यक्रम आज

नागपूर : समदृष्टी क्षमता विकास एवम अनुसंधान मंडळ ( सक्षम ) या संस्थेला दहा वर्ष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!