Breaking News
Home / Trending / ‘प्रेस क्लब’ प्रकरणी राज्य सरकारला नोटीस

‘प्रेस क्लब’ प्रकरणी राज्य सरकारला नोटीस

 
बेकायदेशीर जागा दिल्याचा दावा 
 
नागपूर, (प्रतिनिधी) :
सिव्हिल लाईन्समधील बालभारती कार्यालयाच्या शेजारी असलेली शासकीय जागा बेकायदेशीररीत्या प्रेस क्लबला दिल्याचा दावा करणाऱ्या दाखल जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव, न्याय व विधि विभागाचे सचिव, नागपूरचे जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांना नोटीस बजावून तीन आठवड्याच्या आत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. तर, नागपूर खंडपीठाचे निबंधक आणि प्रेस क्लबच्या अध्यक्षांना हमदस्त पाठवण्यात आली आहे.
हिच ती प्रेस क्लब ला दिलेली वादग्रस्त जागा !
  
नागरिक हक्क संरक्षण मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी नगरसेवक जनार्दन मून आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष तायडे यांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेमुळे नागपूर वृत्तपत्र वर्तुळात खळबळ उडाली आहे, हे विशेष. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी आणि अरुण उपाध्ये यांच्या खंडपीठाने आज बुधवारी या याचिकेच्या सुनावणीप्रसंगी वरीलप्रमाणे निर्देश दिले. महाराष्ट्र सरकारने कोणतीही अधिसूचना न करता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्तींसाठी राखीव असलेला ६४/१ हा बंगला (स्वाती बंगला) प्रेस क्लबला पाच वर्षाच्या लिजवर उपलब्ध करून दिला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपसचिवांनी काढलेल्या एका पत्रानुसार नागपुरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी ही जागा प्रेस क्लबच्या ताब्यात दिली. प्रेस क्लब ही नोंदणीकृत संस्था नाही, तसेच ही संस्था खासगी आहे. त्यामुळे हा सर्व व्यवहार बेकायदेशीर आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. 
अशी शासकीय जागा एखाद्या संस्थेला देताना सर्वोच्च न्यायालयाने अशाच एका प्रकरणात दिलेल्या निर्णयानुसार त्याबाबत निविदा काढणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पार पाडताना या मुद्द्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. उपसचिवांनी दिलेल्या पत्राच्या दुसऱ्याच दिवशी करारपत्रही करण्यात आले, जागा वाटपाच्या  कुठल्याही शासकीय प्रक्रियेचा याठिकाणी अवलंब न करता त्यास तिलांजली देण्यात आली. असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. अश्विन इंगोले यांनी बाजू मांडली. 
:: बघा – संबधित VIDEO NEWS ::

 

About admin

Check Also

बहुजन विचारवंत जैमिनी कडू यांचे अपघाती निधन

नागपूर,दि.१७ :  फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतील सुप्रसिद्ध विचारवंत प्रा. जैमिनी कडू याचे निधन झाले आहे. त्यांचा सोमवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!