Home / Featured / महावितरणचा क्रिकेट संघ जाहीर

महावितरणचा क्रिकेट संघ जाहीर

४२ वी अखिल भारतीय विदुयत मंडळ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

 

नागपूर,दि. १ मार्च :

 कोलकत्ता इलेक्ट्रिक सप्लाय कार्पोरेशनच्या   वतीने आयोजित ४२ व्या अखिल  भारतीय  विदुयत मंडळ क्रिकेट स्पर्धेसाठी महावितरणचा संघ जाहीर करण्यात आला आहे. चंद्रपूर परिमंडलातील रोहित चरोटे यांच्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. ही  स्पर्धा कोलकत्ता येथे ५ ते ८ मार्च दरम्यान होणार आहे.

नागपूर येथील कोहिनूर क्रिकेट क्लबच्या मैदानावर महावितरण संघाची निवड चाचणी स्पर्धा २४ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत पार पडली.

निवड चाचणी स्पर्धेच्या कालावधीत नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता रफिक शेख यांनी मैदानावर जाऊन पाहणी केली आणि स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

महावितरणचा संघ असा आहे. ओमप्रकाश बकोरिया, मंगेश समदूरकर, नितीन सावर्डेकर, अजय चव्हाण, अनिरुद्ध खंडाळकर, सुरज बल्लाळ, मंगेश जोशी, सारंग चाफले, अंकुश लोखंडे, पवन सूर्यवंशी, शहीद सिद्दीकी, मोहसीन शेख, दीपक भोसले, कल्पेश दुसाने, दिलीप फुंडे यांचा महावितरणच्या संघात समावेश आहे. औरंगाबादचे सच्चीदानंद पाटील यांच्याकडे व्यवस्थापकाची तर राजेश पास्ते यांच्याकडे प्रशिक्षकाची जावबदारी सोपवण्यात आली आहे.

About admin

Check Also

सक्षम दशकपूर्ती समारोह कार्यक्रम आज

नागपूर : समदृष्टी क्षमता विकास एवम अनुसंधान मंडळ ( सक्षम ) या संस्थेला दहा वर्ष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!