Home / Trending / प्रताप वाघमारे यांच्या ‘रचनापर्व’ डिजिटल अल्बमचा मुंबईत प्रकाशन सोहळा संपन्न

प्रताप वाघमारे यांच्या ‘रचनापर्व’ डिजिटल अल्बमचा मुंबईत प्रकाशन सोहळा संपन्न

प्रताप यांंची कविता म्हणजे मराठी साहित्यातील व चित्रपट क्षेत्रातील ग्लॅमर

प्रतिनिधी नागपूर : 

प्रशासकीयअधिकारी व कवी प्रताप वाघमारे यांच्या ‘रचनापर्व’ या डिजिटल अल्बम आणि यू-ट्युब चॅनलचे प्रकाशन १४ फेब्रुवारीला मुंबई येथील बॉलिवूड अड्डा या स्थळी चित्रपट क्षेत्रातील दिग्गज कलावंत व मराठी साहित्यिक यांच्या उपस्थितीत पार पडले़

यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक, कलावंत, पटकथालेखक, समीक्षक आबा उर्फ विद्याधर करमरकर, निर्माते बाबा ठाकूर, ज्येष्ठ अभिनेत्री संजीवनी जाधव, ग्रीन पॉवर प्रॉडक्शनचे संचालक अंकुश ठाकूर, संगीतकार व गायक प्रभास प्रभाकर,  किरण शरद व टीव्ही मालिका व चित्रपटांमधील अनेक लहानमोठे कलावंत तसेच निशांत वाघमारे, किशोर गवळी, माध्यम मुख्य समन्वयक संघपाल गडलिंग, क्रियेटिव्ह हेड पंकेश भगत, माध्यम प्रतिनिधी विजय खवसे, ढाकुलकर, परेश व इतरांची उपस्थिती होती़. सुरुवातीला अल्बम आणि चॅनलला पहिला आॅनलाइन क्लीक करून मान्यवरांनी प्रकाशन झाल्याची घोषणा केली़. प्रताप वाघमारे हे प्रशासकीय अधिकारी आणि त्यातही जबाबदारीच्या विभागात महत्त्वाच्या पदावर असतानाही त्यांनी सांभाळलेल्या कवितेचा छंद हा प्रोत्साहनच नाही तर साहित्यक्षेत्रात नवेपण कोरणारा आहे़ मराठी कवितेला डिजिटलतेचा आयाम देऊन वाचक व रसिका पर्यंत पोहोचविण्याचे फार मोठे काम प्रताप वाघमारे करीत आहे़त त्यांच्या या पाऊलामुळे कवितेला ग्लॅमरस दिवस आल्याचे गौरवाद्गार यावेळी विद्याधर करमकर यांनी काढले़ ज्येष्ठ निर्माते बाबा ठाकूर यांनी वाघमारे यांची कविता शब्द सौंदर्याचे अनघ प्रतीक आहे, अशा प्रकारच्या प्रस्तुतीकरणाने ती अधिक उजळून निघेल, त्यांच्या शब्दलेखणाला शुभेच्छाही त्यांनी व्यक्त केल्या. अभिनेत्री संजीवनी जाधव यांनी डिजिटल अल्बमच्या संकल्पनेवर स्तुतिसुमने उधळत प्रताप यांची कविता तितकीच ‘साहित्य प्रतापी’ आणि मराठी साहित्य व चित्रपट विश्वासाठी आगळेपणे व नावीन्यता ठेवणारी असल्याचे त्या म्हणाल्या. दरम्यान, अनेकांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केली़ बहारदार संचालन वैभव कमल यांनी तर आभार अंकुश ठाकूर यांनी मानले. संपूर्ण महाराष्ट्रात ही कविता वेगाने प्रसारित होत असून, अनेक लाईक्स मिळत आहेत. एका दीर्घ पर्वानंतर महाराष्ट्रात सकस कविता ऐकायला मिळत असल्याच्या प्रतिक्रिया रसिकांच्या आहेत.
मराठी साहित्य विश्वातातील हे अनोखे प्रकाशन सर्वत्र चर्चेचा विषय ठरले आहे.

:: बघा…प्रताप वाघमारे यांच्या ‘रचनापर्व’ डिजिटल अल्बममधील कविता व सबस्क्राईब नक्की करा ::

 

About admin

Check Also

सक्षम दशकपूर्ती समारोह कार्यक्रम आज

नागपूर : समदृष्टी क्षमता विकास एवम अनुसंधान मंडळ ( सक्षम ) या संस्थेला दहा वर्ष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!