Home / Trending / आमदार डि. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी केले पारशिवनीतील 6 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन

आमदार डि. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी केले पारशिवनीतील 6 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन

पारशिवनी :
आमदार डि. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी नुकतेच पारशिवनीतील 6 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन केले. या भूमीपूजन सोहळ्यात बोलताना आमदार रेड्डी म्हणाले कि, आपल्या विकासकामांचे माध्यमातून पारशिवनी क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलण्याचे माझे स्वप्न आहे इतकेच नव्हे तर या क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्याचा मी ध्यास घेतला आहे. ”गोरगरिबांना शासन नियमानुसार जागेचे पट्टे वाटप करण्यात येईल, शहरातील प्रत्येक वार्डात पिण्याच्या पाण्यासाठी नवीन पाईप टाकून नागरिकांना नळ कनेक्शन दिल्या जाईल याकरिता अर्ज करावा, तसे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे” असेही रेड्डी यांनी म्ह्टले आहे.
आमदार रेड्डी यांच्या हस्ते नवीन पाईप लाईन, १ कोटी ६५ लाखाचा निधी अंतर्गत नवीन पाईपलाईन, ३ कोटी ५ लाख निधी अंतर्गत चारगाव ते कुवारा भिवसेन या ८ किलोमीटरचा रस्ता, यासह पारशिवनी शहरातील ६ वार्ड मध्ये सिमेंट रस्ते, सिमेंट नाली अश्या विविध विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले
या भूमीपूजन सोहळ्यात जि. प. सदस्य कमलाकर मेंघर, पं. स. सभापती राजेश कडू, सा. बां. विभागाचे आर. व्ही. वासनिक, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गव्हाणकर, नायब तहसीलदार अट्टेवार, न. पं. मुख्यअधिकारी मानकर, तालुका समन्वय समिती अध्यक्ष वसंता वांढे,  भाजपा तालुकाध्यक्ष जयराम मेहरकुळे, शहराध्यक्ष परसराम राऊत, रेखाताई दूनेकर, नीलमताई पालीवाल, छाया येरखेडे, मनीष वैद्य, व्यंकट कारेमोरे, जीवन मुंगले, विवेक तांदूळकर, नंदलाल बावनकुळे, विलास मेश्राम, रवींद्र बावणे, रामभाऊ दिवटे, अशोक कुथे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
…तो बालक रडला आणि आमदार रेड्डींचे मन पाझरले
भूमीपूजन सोहळा सुरु असताना अचानक एक छोटा मुलगा मंचकावर चढला आणि हुंदके देऊन रडू लागला. तद्वतच आमदार रेड्डी यांची नजर त्या बाळावर पडली. “का रडतोय?” असे बालकाला विचारले असता, “आम्हाला रहायला घर आणि जागा नाहीये. त्यासाठी आम्ही अनेकदा निवेदन केले मात्र त्याची अद्यापही दखल घेतली नसल्याने आम्ही हताश आणि निराश झालोय.” असे म्हणत तो मुलगा पुन्हा रडू लागताच आमदार डि. मल्लिकार्जुन रेड्डी यांचे हृद्य पाझरले. लगेच त्यांनी अधिका-यांना बोलावून समस्या सोडविण्याचे आदेश दिले व आमदार निधीतून त्या बालकाच्या परिवाराला मदत देण्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर त्या छोट्याश्या मुलाला आमदार म्हणाले, ‘बाळा तू रडू नकोस…आता तुझी समस्या सुटली आहे.’  आमदारांनी त्या बालकाला हसायला लावले. आता आपल्याला घर नक्की मिळणार या आशेने त्या लहान मुलाने स्मित हास्य करीत आपले रडणे थांबविले. हे दृश्य बघून परिसरातील वातावरण काहीवेळ गंभीर झाले होते.
… बघा घटनास्थळाचा VIRAL VIDEO :

About admin

Check Also

सक्षम दशकपूर्ती समारोह कार्यक्रम आज

नागपूर : समदृष्टी क्षमता विकास एवम अनुसंधान मंडळ ( सक्षम ) या संस्थेला दहा वर्ष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!