Breaking News
Home / Trending / आ. विकास कुंभारे यांच्या हस्ते छाबरानी डेंटल हॉस्पिटल उद्घाटन

आ. विकास कुंभारे यांच्या हस्ते छाबरानी डेंटल हॉस्पिटल उद्घाटन

नागपूर :

मध्य नागपुरचे आमदार विकास कुंभारे यांच्या हस्ते अत्याधूनिक छाबरानी डेंटल हॉस्पिटलचे उद्घाटन झाले. यावेळी डॉ. विंकी रुघवानी, डॉ. हेमंत छाबरानी, डॉ. गिरीष छाबरानी, डॉ. वानी छाबरानी आदी उपस्थित होते.

नागपूर येथील सेंट्रल ऐव्हन्यू मार्गावरील दरोडकर चौक येथील महालक्ष्मी कॉम्पलेक्स येथे हे हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये दंतरोग तज्ज्ञांकडून दंतरोगासंबंधिचे सर्व उपचार केले जातात. यात आरथोडोंटीक, रुट कॅनल ट्रिटमेंट, चाईल्ड डेंटीस्ट्री, टिथ व्हायटनिंग, डेंटल इम्प्लासमेंट, स्माईल डिझायनिंग, टीएमजे प्रॉब्लेम्स, डेंटल एक्सट्रॅक्सन, टूथ ज्वेलरी आदींचा समावेश आहे. आरवीजी विथ कॅमरा, डेंटल युएसबी, अॅपक्स लोकॅटर, एन्डोमेटर, पेंटामिक्स- ३ एम, युव्ही चेंबर आदी अत्याधूनिक साहित्य आहे. डॉ. गिरीष छाबरानी म्हणाले, “या हॉस्पिटलमध्ये दंत रोगासंबंधिचे सर्व उपचार केले जातात. चिमुकल्यांना दंत रोगासंबंधिच्या आजारांवर येथे माफक दरात उपचार केले जातात.”

डॉ. वानी छाबरानी म्हणाल्या, “या हॉस्पिटलमध्ये अत्याधूनिक यंत्र व साधने आहेत. रुग्णांना कमी त्रास आणि लवकर निदान या यंत्र व साधनांचा उपयोग करुन केला जातो.” उद्घाटन सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

VIDEO NEWS


 

About admin

Check Also

बहुजन विचारवंत जैमिनी कडू यांचे अपघाती निधन

नागपूर,दि.१७ :  फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतील सुप्रसिद्ध विचारवंत प्रा. जैमिनी कडू याचे निधन झाले आहे. त्यांचा सोमवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!