Breaking News
Home / Trending / मराठी शाळा बंद करुन कॉर्पोरेट कंपन्यांना क़ुरन मोकळे करुन देण्याचा शासनाचा घाट – माजी आमदार विजयबाबु घोड़मारे

मराठी शाळा बंद करुन कॉर्पोरेट कंपन्यांना क़ुरन मोकळे करुन देण्याचा शासनाचा घाट – माजी आमदार विजयबाबु घोड़मारे

भाजप प्रणित सरकारला घरचा अहेर

वानाडोंगरी, (भाई शिरसाठ) :

गोर गरीब जनतेला मोफत शिक्षण मिळत असल्याने भाजपा सरकारच्या पोटात दुखु लागले , आदिवासी , मागासवर्गीय व बहुजनाना मोफत शिक्षण मिळू नये या कुटिल हेतुन शासन मराठी शाळा बंद करुन कॉर्पोरेट कंपन्यांना CSR फंडातुंन शाळा उघड़न्यासाठी कट रचत असल्याचा घनाघाती आरोप भारतीय जनता पार्टीचे हिंगणा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार विजयबाबु घोड़मारे पाटील यांनी केला.

ते आज गुरुवार  (दि, 11) रोजी हिंगणा येथे स्व. श्री संदीप कोहाड़ फाउंडेशन च्या वतीने घेन्यात आलेल्या विद्यार्थी सत्कार समारंभात बोलत होते. या वेळी भाजपा चे हिंगणा मंडळाचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव कोहाड़ भाजपा जेष्ठ कार्यकर्ते देवराव अडेकर, रमेश ढवले पाटील नागपुर जिल्हा परिषद चे माजी सदस्य मारोती हजारे, रायपुर ग्राम पंचायत च्या उपसरपंचा श्रीमती दिपाली कोहाड़ , पुरुषोत्तम देशमुख भास्कर धार्मीक , मंसूर महाजन संजय हुरपाटे , प्रकाश भोगे , मंचावर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी पालक व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

कॉर्पोरेट कंपनीना शाळा उघडण्याची मुभा देऊन सर्व सामान्य नागरिकांना मिळणाऱ्या शासनाच्या योजना बंद करू पाहत आहे. तेव्हा विद्यार्थी पालक आणि सुजान नागरिकांनी भाजपा सरकार चा डाव हानुन पाडला पाहीजे असे आवाहन घोड़मारे पाटील यांनी केले. या वरुन असे दिसतय की ओबीसी चे नेते बंड करुन सरकारला घेरन्याच्या तयारीला लागले आहेत. हिंगणा विधानसभा क्षेत्रातही यामुळे सर्व काही आलबेल असल्याचे चित्र आहे.

About admin

Check Also

बहुजन विचारवंत जैमिनी कडू यांचे अपघाती निधन

नागपूर,दि.१७ :  फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतील सुप्रसिद्ध विचारवंत प्रा. जैमिनी कडू याचे निधन झाले आहे. त्यांचा सोमवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!