Home / Featured / अन…भावनेच्या ओगात आमदाराकडून सभागृहातच अश्लिल शब्दाचा वापर

अन…भावनेच्या ओगात आमदाराकडून सभागृहातच अश्लिल शब्दाचा वापर

थेट विधानभवनातून : चौथा दिवस

नागपूर, (प्रतिनिधि) :

महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक २०१७ वर बोलताना एका आमदारांनी भावनेच्या ओघात सभागृहातच अश्लिल शब्द उच्चारले. अश्लिल शब्द बोलण्याची जाणीव लक्षात येताच त्या आमदार महोदयांनी सभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे व सभागृहातील समस्त सदस्यांची जाहीर माफी मागितली. मी विदर्भातील आमदार आहे. त्यामुळे बोलण्याच्या ओघातून हा शब्द मुखातून निघाला. याबाबत कुणीही गैरसमज बाळगु नये, मी सभागृहाची माफी मागतो, असे ‘ते’ आमदार म्हणाले. मात्र यावर अजीत पवार यांनी “लगे रहो” असा इशारा दिला.

नाथा भाऊंनी फोडली वाचा : जलयुक्त शिवारांच्या कामात होणार सुधारणा

जलयुक्त शिवार योजना ही चांगली आहे. मात्र तांत्रिक अडचणीत ती अडकली. खोलीकरण, रुंदीकरण आदी कामे हे जलयुक्त शिवारात तांत्रिक अडचणीमुळे नव्हतात. यामुळे जलयुक्त शिवाराची कामे रखडली असून यात सुधारणा होणार का ? …कामाच प्रोत्साहन द्यायच व कामे होणार नाही, अस जर असेल तर मं>यांनी यामागची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी नाथा उर्फ एकनाथ खडसे यांनी सभागृहात केली. जलयुक्त शिवारांची अनेक कामे प्रलंबित आहेत. ही कामे लवकर करण्यासाठी माथा ते पायऱ्यापर्यंतचे नियम कडक करावे, अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली. यावर खात्याचे मंत्री प्रा. रामशिंदे यांनी रत्नागिरी जिल्हयात १३२ कामे, रायगड जिल्हयात ६८, सिंधुर्दुग येथे ३२ कामे प्रलंबित असल्याचे सांगितले. जलसंपदा विभागाने सन २०१६-२०१७ मध्ये नवीन दर सुची प्रसिध्द केली आहे. त्या अनुसंगाने स्वातंत्र दर सुची तयार करण्याचे काम प्रगती पथावर आहे. विविध कामांच्या अंदाज पत्रकिय दर प्रुथक करण्यासाठी विभागाची सामाजिक दर सुची तयार करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. दर सुची चे काम अंतीम टप्प्यात असल्याचे सांगितले.

About admin

Check Also

सक्षम दशकपूर्ती समारोह कार्यक्रम आज

नागपूर : समदृष्टी क्षमता विकास एवम अनुसंधान मंडळ ( सक्षम ) या संस्थेला दहा वर्ष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!